छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ देशात सर्वोत्तम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल (टी 2) देशात सर्वोत्तम पायाभूत सुविधा असलेले ठरले आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल (टी 2) देशात सर्वोत्तम पायाभूत सुविधा असलेले ठरले आहे. त्याबद्दल एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (एसीआय) या संस्थेने या विमानतळाला सुवर्ण पुरस्कार जाहीर केला आहे. 

देशात सर्वांत व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तासाला सरासरी 48 विमानांची ये-जा होते. एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलने अलीकडेच सर्व विमानतळांची पाहणी केली. स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत या विमानतळाला सुवर्ण पुरस्काराचा मान मिळाला आहे.

एकाच धावपट्टीवरून सुलभपणे होणारी विमानांची वाहतूक आणि प्रवाशांची काळजी, याबद्दल मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (मिआल) या कंपनीला चार कोटी प्रवासी श्रेणीत प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. 
 

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj International Airport is Best in India