शेतकरी कर्जमाफीच्या अर्जाची मुदत 14 एप्रिलपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018 पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची मुदत होती. आता ही मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवरून प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीची मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018 पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची मुदत होती. आता ही मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवरून प्रसिद्ध करण्यात आले आहे. 
 
अर्ज भरण्याची सेवा महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई-संग्राम केंद्रावरून नि:शुल्क पुरविण्याबाबत त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत:सुद्धा http://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून यूजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येईल. उपरोक्त कालावधीत आपले सरकार सेवा केंद्र, सर्व महा-ई-सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई-संग्राम यांनी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज नि:शुल्क भरून देण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नाव ग्रीन यादीमध्ये आले नाही, मिसमॅच डाटामध्ये नाही, तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari sanman Yojana dates extended