

Maharashtra Electricity Tariff Reduction
ESakal
Devendra Fadnavis Electricity Tariff Reduction : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक मोठी घोषणा केली आहे की, पुढील पाच वर्षांत राज्यात वीज दरात वाढ करण्याऐवजी ते दरवर्षी १.२ टक्क्यांनी कमी केले जातील. २०२९ पर्यंत दर स्थिर होतील. सौर ऊर्जेची वाढती उपलब्धता लक्षात घेऊन सरकारने आपल्या धोरणात सुधारणा केली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या उद्योगांना आता २५ टक्के सवलत मिळेल. यापूर्वी ही सवलत मध्यरात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत मिळत होती.