Eknath Shinde : पाकिस्तान घाबरायचा तो फक्त बाळासाहेबांना... मुख्यमंत्र्यांकडून आठवणींना उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm eknath shinde on balasaheb thackeray

Eknath Shinde : पाकिस्तान घाबरायचा तो फक्त बाळासाहेबांना... मुख्यमंत्र्यांकडून आठवणींना उजाळा

मुंबईः विधानभवनातल्या सेंट्रल हॉलमध्ये आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यासह राज्यातल्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची कारकीर्द आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांचा आवाका सांगतांना शिंदे म्हणाले की, पाकिस्तान हा देश कुठल्या पंतप्रधानांना वा राष्ट्रपतींना घाबरला नाही, ते घाबरायचे फक्त बाळासाहेबांना. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या नेत्यांचं गल्लीबोळातल्या समस्यांवरही लक्ष होतं. म्हणून ते बलाढ्य नेते ठरले, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हेही वाचा: Balasaheb Thackeray: विधानभवनात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं CM शिंदेंच्या हस्ते अनावरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणातील मुद्दे

 • आजचा कार्यक्रम अनमोल आहे, त्याचं मोल करता येणार नाही

 • विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत

 • त्यांनी आमची विनंती मान्य करुन सर्व जबाबदारी सांभाळली

 • बाळासाहेबांचा पगडा आमच्यावर लहानपणापासून होता

 • त्यामुळेच बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं

 • विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांचं तैलचित्र लावलं जातंय, हा माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे

बाळासाहेबांचा माझ्यावर विश्वास होता- शिंदे

 • बाळासाहेबांमुळे सामान्य लोक सत्तेच्या प्रवाहात आले

 • एखाद्या शेतकऱ्याचा, गरीबाचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकला तो त्यांच्यामुळेच

 • जिथे अन्याय होतो तिथे पेटून उठा, हीच बाळासाहेबांची शिकवण

 • बाळासाहेबांनी एकदा शब्द दिला की दिला. त्यांनी कधीही शब्द फिरवला नाही

 • अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आणि ताकद त्यांनी आम्हाला दिली.

 • धाडस महत्त्वाचं असतं. त्यासाठी हिंमत लागते. त्यासाठी तसे गुरु लागतात

 • आनंद दिघे साहेब आज असते तर त्यांना आजचा कार्यक्रम बघून उर भरुन आला असता

 • ठाणं आणि शिवसेना हे नातं अतूट होतं

 • हा एकनाथ शिंदे आनंद दिघेंच्या तालमीत तयार झाला आहे

 • त्यामुळे मला आता ठाण्याची चिंता नाही, असा बाळासाहेबांचा माझ्यावर विश्वास होता

पाकिस्तानच्या उरात धडकी भरायची

 • पाकिस्तान एकाच नावाला घाबरत होता, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे

 • कुठल्याच पंतप्रधानांना,राष्ट्रपतींना पाकिस्तान घाबरत नव्हता

 • बाळासाहेब नेहमी सांगायचे तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवरची कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही.

 • धाडस आणि आत्मविश्वास हे आम्हांला बाळासाहेबांनी दिलं, त्यामुळे आज आम्ही हे धाडस करु शकलो.

 • हिंदुत्त्वाचा भगवा रंग सगळीकडे पसरलेला पहायचाय, असं बाळासाहेब म्हणाले होते.

 • त्यांनी मुस्लिम बांधवांचा सन्मान केला परंतु हिंदुस्थानात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारांबद्दल बाळासाहेब काय बोलायचे, हे सर्वांना माहिती आहे

 • बाळासाहेबांच्या विचारात ओतप्रोत राष्ट्रभक्ती, देशभक्ती होती. त्यामुळे त्यांनी सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी कधीही तडजोड केली नाही

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे प्रमुख राज ठाकरे, अॅड. निहार ठाकरे, स्मिता ठाकरे, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आदी उपस्थित होते.