विधानभवनात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं CM शिंदेंच्या हस्ते अनावरण : Balasaheb Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thackeray

Balasaheb Thackeray: विधानभवनात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं CM शिंदेंच्या हस्ते अनावरण

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र विधानभवनात लावण्यात आलं आहे. याचा अनावरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त हे तैलचित्र लावण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे प्रमुख राज ठाकरे, अॅड. निहार ठाकरे, स्मिता ठाकरे, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आदी उपस्थित होते. (Balasaheb Thackeray Birth Anniversary Unveiling Oil Painting at Vidhan Bhavan)

हेही वाचा: Sonam Wangchuk: मायनस 40 डिग्रीमध्ये सोनम वांगचूक करणार आंदोलन; व्हिडिओ पाहाल तर...

चित्रकार किशोर नादवडेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेलं हे तैलचित्र असून विधानभवनातील मुख्य सभागृहात ते लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा: Dog calling Dog: शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याला 'कुत्रा' म्हटलं अन्...; तुमचाही उडेल थरकाप

तैलचित्राचं आनावरण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंमुळेच मी आज या व्यासपीठावर आहे. त्यांच्यामुळेच मी आजचा क्षण अनुभवतो आहे. बाळासाहेबांमुळेच महाराष्ट्रातील अखंडता कायम आहे. त्यांनी धर्मांमध्ये कधीच भेदभाव केला नाही.

हेही वाचा: Awhad on Koshyari: "राज्यपालांची इच्छा म्हणजे दिल्लीश्वरांचा महाराष्ट्राला इशारा"; आव्हाड असं का म्हणाले?

तत्पूर्वी अंबादास दानवे, अजित पवार, नीलम गोऱ्हे, नारायण राणे, राज ठाकरे यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.