मुख्यमंत्र्यांचा फेसबुक अजेंडा 

मृणालिनी नानिवडेकर - सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई - महाराष्ट्रातील 25 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकांच्या प्रचाराची धुरा वाहतानाच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 10 सभा घेणार आहेत. मुंबईतील विजय सर्वाधिक महत्त्वाचा असल्याने पूर्वी केवळ 5 ते 6 वर मर्यादित असलेल्या सभांची संख्या 10 पर्यंत नेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या नागरिकांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याची उत्सुकता दाखवल्याने 6 फेब्रुवारी रोजी फेसबुक चाटरूमचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 50 हजार नागरिकांनी यात सहभागी होण्याची इच्छा दाखवल्याचे सांगण्यात येत आहे. 

मराठी व्होट बॅंक एकत्र आणण्यासाठी शिवसेनेने युद्धस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने या प्रचाराला उत्तर देण्यासाठी आता मोहीम आखली आहे. रेडिओ, दूरदर्शनच्या माध्यमातून भाजपची प्रचारमोहीम सुरू होईल. परिवर्तनासाठी मत हा फडणवीस यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. भाजपने मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत; पण त्याच वेळी मुंबईतील बहुभाषक मतदारावर भाजपचा खरा भर असेल. महाराष्ट्रात मतदानासाठी जाणाऱ्या 25 जिल्हा परिषदांतही फडणवीस हेच स्टार प्रचारक असतील. मुंबईत प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी फडणवीस यांची किमान एक प्रचार सभा आयोजित केली जाणार आहे. त्याचबरोबर 10 महापालिकांमध्ये किमान एक सभा आयोजित व्हायला हवी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक महापालिकांत फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन घडी बसवण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर ही फडणवीस यांची कर्मभूमी असल्याने तेथे प्रचारासाठी त्यांना अधिक वेळ द्यावा लागणार आहे. आशिष शेलार यांच्याही प्रचारसभा मोठ्या प्रमाणात होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई पालिकेत प्रचारासाठी आणले जाणार नाही, मात्र बांद्रा कुर्ला संकुलात 19 फेब्रुवारी रोजी फडणवीस यांची सभा आयोजित होणार आहे. तत्पूर्वी 18 रोजी शिवसेनेची सभा होणार आहे हे विशेष. 

हुतात्मा स्मारक का टाळले ? 
दरम्यान, आज मुंबईत 227 उमेदवारांनी हुतात्मा स्मारकावर पारदर्शी कारभाराची शपथ घेतली. त्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भाच्या वेगळ्या राज्याचा पुरस्कार करणाऱ्या फडणवीस यांनी या वेळी हजर राहाणे टाळले, अशी कुजबूज शिवसेनेने सुरू केली आहे. त्यांचे असे हजर रहाणे नागपुरात अडचणीचा विषय तर ठरले नसते ना, असा प्रश्‍न शिवसेनेतील एका नेत्याने उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी हा विषय प्रचाराचा मुद्दा करावा, अशी सूचनाही करण्यात आली.

Web Title: Chief Minister Facebook agenda