मुंबई - मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर गृह, नगरविकास, महसूल खात्यासाठी अडून बसलेल्या एकनाथ शिंदे यांनी अखेर शिवसेना आमदारांच्या दबाव आणि भाजपच्या दुर्लक्षामुळे नाइलाज झाल्याने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली..शिंदे यांनी भाजपवर दबाव आणत अखेरपर्यंत प्रमुख खात्यांसाठी आग्रह कायम ठेवल्याने उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ शकला नाही. त्यामुळे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या नेत्यांसह मुंबईत मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. बुधवारी दुपारी सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झाले होते. तसेच अजित पवार यांनीही शपथ घेण्यास अनुकूलता दर्शविल्याने शिंदे यांच्या निर्णयाची प्रतीक्षा होती..शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या सायंकाळपर्यंत ठरवू असे सांगितले होते. मात्र शिंदे हे गृह, महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम या महत्त्वाच्या खात्यांसाठी अडून बसले होते. मात्र भाजपने त्यांची समजूत काढत गिरीश महाजन यांच्याकरवी दोन वेळा निरोप पाठवला. तसेच फडणवीस यांनी स्वत: त्यांची समजूत काढली. तरीही शिंदे यांचा आग्रह कायम होता..भाजपचा वरचष्माआझाद मैदानावर आयोजित केलेला शपथविधी सोहळा हा महायुतीच्या नेत्यांचा होता. पण संपूर्ण शपथविधी सोहळ्यावर भाजपचाच वरचष्मा होता. अगदी व्यासपीठावरील भाजपच्या केंद्रीय नेत्यांपासून भाजपच्याच कार्यकर्त्यांचे वर्चस्व दिसून येत होते..पाहुण्यांची मोठी गर्दीआझाद मैदानात झालेल्या शपथविधीसाठी चार मोठे मंडप उभारण्यात आले होते. साधू-महंतांसाठी एक तर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दुसरा विशेष मंच उभारण्यात आला होता. त्याच्या मधोमध शपथविधीसाठी मुख्य मंच उभारण्यात आला होता..त्यापुढे उभारण्यात आलेल्या मंडपात सर्वच ठिकाणी पाहुणे, निमंत्रित, सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तसेच परिरातील हॉटेल बंद असल्याने अनेकांच्या खाण्यापिण्याचीही गैरसोय झाली.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.