Ajit Pawar: पक्षाच्या वरिष्ठांच्या चुकीमुळे मुख्यमंत्री पद गेलं; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

अजित पवार यांना स्पष्टवक्ते आणि फटकळ बोलण्यामुळे ही ओळखलं जातं
NCP
NCPesakal

राजकारणातील 'दादा' म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांना स्पष्टवक्ते आणि फटकळ बोलण्यामुळे ही ओळखलं जातं. यामुळे ते अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमध्ये अडकलेल्याचे पाहायला मिळते.

NCP
MLC Election: शिंदे गटाचा भाजपला पहिला मोठा धक्का; अमरावतीच्या जागेवर भाजपचा धक्कदायक पराभव

मात्र त्यानंतर वाद वाढू नये म्हणून दिलगीरी देखील व्यक्त करतात. अजित पवारांनी सोलापुरच्या एका सभेतील वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच वादात होते. त्यावेळी त्यानी दुसऱ्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी बसून आत्मक्लेश उपोषण केलं होतं.

NCP
Sanjay Raut : निवडणुकीत भराडी देवीचा आम्हाला पाठिंबा असता तर..; असं का म्हणाले राऊत?

मात्र काल त्यांनी अशीच एक खंत स्पष्टपणे व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी खंत बोलून दाखवली ते म्हणाले की, "२००४ साली मोठी चूक झाली राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पद सोडायला नको होतं. त्यावेळी पक्षाने आर.आर.पाटलांना, छगन भुजबळांना अजून वरिष्ठांना वाटत होत त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं.

२००४ ला जर मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला आलं असत तर चांगलं झालं असत अशी खंत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी ठरला होता. त्या पाठोपाठ काँग्रेस ६९ आणि शिवसेना ६२ तरी देखील राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद काँग्रेससाठी सोडत उपमुख्यमंत्री पद घेतलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com