
असे पैशाचे खेळ करुन निवासस्थानं आणि श्रध्दास्थानं ताब्यात घेता येत नाहीत.
Sanjay Raut : निवडणुकीत भराडी देवीचा आम्हाला पाठिंबा असता तर..; असं का म्हणाले राऊत?
मुंबई : विधानसभा निवडणुकीत आम्ही एकमेकांना मदत केली. आता पिंपरी आणि कसबा इथं सुध्दा आम्ही त्याच स्पिरीटनं निवडणूक लढू, असं शिवसेना नेते (उध्दव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
माध्यमांशी बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, शक्ती प्रदर्शनानं आणि पैशाची ताकद दाखवून देवी पावते का? ती कोकणातली भराडी देवी आहे. आयुष्यभर त्या देवीनं शिवसेनेला आशीर्वाद दिलेत. शिवसेनेचा जन्म कोकणातून झाला आहे. भराडी देवीचा जर पाठिंबा असता तर कालच्या निवडणुकीत दिसला नसता, देवी ही देवी आहे, असं त्यांनी नमूद केलं.
भराडी देवी सगळ्यांचं कल्याण करते. पण, ती कोकणच्या भूमीवरची देवी आहे आणि या देवीचं मांगल्य का आहे हे आम्हाला चांगलंच माहित आहे. असे पैशाचे खेळ करुन निवासस्थानं आणि श्रध्दास्थानं ताब्यात घेता येत नाहीत. उध्दव ठाकरेंनी विश्वासतल्या लोकांवर जास्त विश्वास ठेवला, त्यामुळं असं चित्र उभारलं आहे. 32 वर्षाच्या तरुणाचं (आदित्य ठाकरे) मुख्यमंत्र्यांनी आवाहन स्वीकारावं, असं आव्हानही राऊतांनी शिंदेंना केलं आहे.