Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे रमले शेतात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या दरे येथील शेतात वृक्षारोपण केले. त्यांनी आज आपल्या शेतात फेरफटका मारून नारळाची झाडे लावली. मुख्यमंत्र्यांनी शेतात विविध प्रयोगही केले आहेत.
Eknath Shinde
Eknath Shinde sakal

महाबळेश्वर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या दरे येथील शेतात वृक्षारोपण केले. त्यांनी आज आपल्या शेतात फेरफटका मारून नारळाची झाडे लावली. मुख्यमंत्र्यांनी शेतात विविध प्रयोगही केले आहेत.

गावाला जेव्हा- जेव्हा येतो तेव्हा मी आवर्जून झाडे लावतो, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘सगळ्या प्रकारची झाडे लावतो. मोसंबी, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, जांभूळ, आंबा, काजू, आवळा, केळी अशी फळझाडे लावली आहेत.

झाडे चांगली वाढली आहेत. रक्तचंदन, हळद, शतावरी अशी औषधी वनस्पतीही लावली आहेत. रेशीम लागवड केली आहे. रेशीममधून दहा शेतकऱ्यांना अडीच लाख मिळाले. रेशीम शेती लोकांनी एकत्रितपणे केल्यास मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील.

बांबू लागवड मोठ्या प्रमाणात करत आहे. बांबूचे खूप उपयोग आहेत. बांबूचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत. बांबूचे खूप उपपदार्थ तयार करू शकतो. त्यामुळे बांबूची समूह शेती करण्याची गरज आहे. बांबूला आपण अनुदान देत आहे. त्याचा उद्देश हाच आहे, की नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण पुन्हा गावाला येऊन शेती करतील.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com