बेळगाव सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

बेळगाव आणि कारवार हा कर्नाटकव्याप्त भाग आहे,' असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांचा हा हक्‍काचा भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी राजकीय मतभेद विसरून कायदेशीर लढाईला वेग देणार, असे आज स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज मंत्रालयात बैठक घेतली.

मुंबई : "बेळगाव आणि कारवार हा कर्नाटकव्याप्त भाग आहे,' असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांचा हा हक्‍काचा भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी राजकीय मतभेद विसरून कायदेशीर लढाईला वेग देणार, असे आज स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज मंत्रालयात बैठक घेतली. या वेळी एकीकरण समितीच्या सर्व सदस्यांसोबत मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, नितीन राऊत, आमदार हसन मुश्रीफ, राजेश पाटील, अनिल परब व महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आदी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी सरकारी वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे आदेशदेखील या वेळी दिले. तसेच राज्य सरकार, एकीकरण समिती व सर्वोच्च न्यायालयाचे वकील यांच्यात समन्वय साधण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले. याबाबत मुख्यमंत्री स्वत: ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्याशीदेखील चर्चा करणार आहेत.

महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर तातडीने सीमाप्रश्नी बैठक बोलावून एकीकरण समितीला निमंत्रण दिले, यावरून याप्रश्नी महाराष्ट्राची बाजू अधिक मजबूत करण्याची इच्छा असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. सीमा भागातील गावांच्या कायदेशीर लढ्यात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी कालबद्ध रीतीने जाण्याच्यादेखील सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सध्या कायदेशीर लढा सुरू आहे. हा खटला जलद गतीने संपविण्यासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी या खटल्यातील वकिलांची तातडीने संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसेच, खटल्याच्या पुढील सुनावणीस ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी बाजू मांडावी, यासाठी त्यांना विनंती करण्यात येईल. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार

बेळगाव हा महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त प्रदेश आहे, असे वक्‍तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्राच्या इतिहासात असे स्पष्ट वक्‍तव्य करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे लाभल्याचा आनंद आहे. सीमाबांधवांना या सरकारकडून निश्‍चितच न्याय मिळेल, असा विश्‍वास आहे. - दीपक दळवी, अध्यक्ष, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray aggression over maharashtra karnataka Border Dispute