"साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व हरपले'

"साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व हरपले'
"साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व हरपले'
"साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व हरपले' Canva
Summary

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वाधिक काळ आणि सातत्याने गणतपराव देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच.

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्यावर 16 जुलैपासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर पित्ताशयातील खड्याची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यांच्या प्रकृतीत अनेकवेळा चढ-उतार सुरू होता. काही वेळेस त्यांची प्रकृती चिंताजनकही बनली होती. आज शुक्रवारी (ता. 30) सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्त्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सांगोल्याचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. (Chief Minister Uddhav Thackeray expressed grief over the demise of former MLA Ganpatrao Deshmukh-ssd73)

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व, एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी अकरा वेळा आमदार झालेले, अभ्यासू, संयमी व विशेषतः "जनसामान्यातील माणूस' म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने "जनसामान्यांचा लोकनेता' हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वाधिक काळ आणि सातत्याने गणतपराव देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्त्वाचे वाटते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com