esakal | पँडेमिकचा एंडेमिक होऊ नये, CM ठाकरेंचा विरोधकांना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

पँडेमिकचा एंडेमिक होऊ नये, CM ठाकरेंचा विरोधकांना टोला

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोरोना हा शत्रू अजूनही पुर्णपणे हारलेला नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील यंत्रणेला सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

'माझा डॉक्टर' या वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यामातून रविवारी टास्क फोर्ससह राज्यभरातील डॉक्टरांशी संवाद साधला. संभाव्य तिसरी लाट (Third Wave of Covid 19), उपाययोजना आणि राज्याची सज्जता या विषयावर यावेळी त्यांनी संबोधित केलं. राज्यातील कोविड टास्क फोर्सने (Covid-19 Task Force) 'माझा डॉक्टर' ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली होती. राज्यातील कोरोना परिस्थीचा आढावा घेतानाच विरोधकांनाही खडे बोल सुनावले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जगभरातील कोरोना परिस्तितीचा दाखला देत विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, 'राज्यात गेल्या काही दिवसांपासून निर्बंध आणखी शिथिल करा, अशी मागणी होत आहे. हे उघड, ते उघड चालू आहे. पण कोरोनाच्या संकटकाळात घाई केली तर, पँडेमिकचा एँडेमिक होऊ शकतो.'

कोरोना विषाणूविरोधात आपली शस्त्र तयारं आहेत. आपण तिसऱ्या लाटेची तयारी केली आहे. ऑक्सिजनसह बेड आणि गोळ्या औषधांचा मुबलक साठा आहे. पण आपण काळजी घेतली पाहिजे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव वेगळा आहे. आपण दोन्ही लाटेवर मात केली आहे. पण आता येणाऱ्या तिसऱ्या लाटेची आपण तयारी करायला हवा. पण काही लोक सतत हे उघडा ते उघडा असं म्हणत असतात. मात्र, अति घाई केली तर पँडेमिक चा एँडेमिक होऊ शकतो. ते खरं तर होऊ नये. एँडेमिक होतो म्हणजे काय होतं तर... कोरोना सदैव आपल्यासोबत राहू शकतो. तसं होऊ नये म्हणून आज आपल्याला तयारी करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझा डॉक्टर' या वैद्यकीय परिषदेत सांगितलंय.

हेही वाचा: नेत्यांच्या सभांना गर्दी चालते, सणांच्या वेळी का नाही?- राज ठाकरे

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केलं. ते म्हणाले, 'कोरोना हा शत्रु अजूनही पुर्णपणे हारलेला नाही. राज्यातील यंत्रणेला सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. जगभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला असता त्यामधून चिंताजनक परिस्थिती दिसत आहे. जर गर्दी आटोक्यात आली नाही तर पुन्हा राज्यातील निर्बंध वाढवावे लागतील.' राज्यात सण समारंभाचे दिवस सुरु झाले आहेत. गेल्या वर्षी सन उत्सव झाल्यानंतर कोरोनाची लाट उसळली होती, त्यामुळे यावेळी गर्दी होणर नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वैद्यकिय यंत्रणेच्या उपलब्धतेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी जवळपास सव्वालाख बेड वाढवले असल्याची माहिती दिली. या बेडसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन उपलब्ध करणे, हे मोठे आव्हान असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. याआधी राज्याची १२ मेट्रीकटन ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता होती, त्यामध्ये आता वाढ झाली आहे. राज्यात आता १४ मेट्रीकटनपर्यंत ऑक्सिजन निर्माण होतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाच्या मोहीमेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

loading image
go to top