esakal | मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला येणे टाळावे - बंडातात्या कराडकर
sakal

बोलून बातमी शोधा

bandatatya karadkar

मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला येणे टाळावे - बंडातात्या कराडकर

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

पुणे : कोरोनाच्या (corona) पार्श्वभुमीवर गतवर्षी देखील आषाढी वारीवर (Ashadhi wari) राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. यावरती हभप बंडातात्या कराडकर (Bandatatya karadkar) यांनी वारकऱ्यांना पायी दिंडी काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यावर बराच वादंग निर्माण झालेला. (Chief Minister Uddhav Thakrey should avoid coming Pandharpur says Bandatatya Karadkar)

तथापी, मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा पार पडणार आहे. या पूजेला व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष हभप बंडातात्या कराडकर (Bandatatya karadkar) यांनी विरोधी दर्शवला आहे.

हेही वाचा: Live: विक्रोळी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा पोहोचला ७ वर

याबाबत बोलताना बंडातात्या कराडकर (Bandatatya karadkar) म्हणाले की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून पांडुरंगाच्या पूजेला येण्याचा टाळावं. ज्या पद्धतीने गेले चार महिने वारकऱ्यांचे आंदोलन गुंडाळण्यात आली त्यावरून महाराष्ट्रात भगव्या झेंड्याच राज्य आहे, असे वाटत नाही. भगव्या झेंड्याचा अपमान सुरू असून, वारकऱ्यांच्या पताका, टाळ, चिपळ्या काढून घेतल्या जातात. वारकऱ्यांच्या पोशाखात चालू नका असा पोलीस दम देतात. दडपशाहीने महाराष्ट्रातील पायीवारी सोहळे आपण रद्द केले. त्यामुळे तुमची पूजा पांडुरंग स्वीकारेल, असे वाटत नाही."

हेही वाचा: 'या' निर्णयाबाबत प्रविण दरेकरांचे राज्य सरकारवर टीकास्त्र, म्हणाले...

दरम्यान, मंगळवारी पंढरपूर (pandharpur) थे आषाढी यात्रा पार पडणार असून, त्यासाठी उद्या आळंदी येथून एसटीच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या रवाना होणार आहेत.

loading image