Tata-Airbus project: टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Tata-Airbus project: टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

महाराष्ट्रात येणारा 'टाटा एअरबस' प्रकल्प गुजरातमध्ये शिफ्ट झाला आहे. यावरुन राज्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे. यावरुन भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधकांनी टार्गेट केलं आहे.त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नंदुरबारमध्ये बोलताना शिंदे म्हणाले की, मोठ्या उद्योगाबाबत मोदी आणि शहा यांच्याशी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आहे. राज्यात भविष्यात मोठे मोठे उद्योग येतील. राज्याची भरभराट होईल. राज्याची समृद्धी होईल. भविष्यात तरुणांच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील असेल असंही शिंदे म्हणालेत.

हेही वाचा: Tata-Airbus project: टाटा एअरबस प्रकल्पावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; काय म्हटलंय जाणून घ्या

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून टाटा एअरबसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प नागपूरहून गुजरातमध्ये शिफ्ट झाल्यावरुन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे.

यापूर्वी १ लाख ६६ हजार कोटी रुपयांचा वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क हे महाराष्ट्रातील दोन मोठे प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेले आहेत. यावरुनही विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं होतं. त्यावेळी यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला देऊ असं आश्वासन केंद्र सकारकडून आपल्याला देण्यात आल्याचं मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं.

टॅग्स :GujaratCM Eknath Shinde