मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने १४ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय काढत ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. त्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठांना सुरवातीला तीर्थदर्शन घेता आले. मात्र, मागील दीड-दोन वर्षांपूर्वी अर्ज केलेल्या जिल्ह्यातील सुमारे ६०० ज्येष्ठांना अजूनही योजनेतून तीर्थदर्शनाला जाता आलेले नाही.
mantralay
mantralaysakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने १४ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय काढत ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. त्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठांना सुरवातीला तीर्थदर्शन घेता आले. मात्र, मागील दीड-दोन वर्षांपूर्वी अर्ज केलेल्या जिल्ह्यातील सुमारे ६०० ज्येष्ठांना अजूनही योजनेतून तीर्थदर्शनाला जाता आलेले नाही. त्यातील काही लाभार्थींनी आशा सोडून दिली आहे.

आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा किंवा अन्य धार्मिक स्थळांना भेटी देऊन दर्शन घ्यावे, असे बहुतांश ज्येष्ठांचे स्वप्न असते. पण, गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा त्या तीर्थक्षेत्रासंदर्भात पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनःशान्ती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी

राज्यातील ज्येष्ठांसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरु केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना जोमात सुरु होती, पण आता अर्ज केलेल्या प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठांना अद्याप तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी वाट पहावी लागत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ६०० लाभार्थी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे अधिकारी देखील या योजनेबद्दल काहीही माहिती देत नाहीत.

योजना नेमकी कशी आहे?

महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. १४ जुलै २०२४ रोजी त्याचा शासन निर्णय निघाला. योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील १६१ आणि देशातील ८८ तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देता येणार होत्या. त्यासाठी प्रत्येकाचा ३० हजार रुपयांचा खर्च सरकारकडून केला जातो.

योजनेसाठी नव्याने करता येईना अर्ज

योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याचा दरवर्षी कोटा निश्चित करून पात्र ज्येष्ठ लाभार्थींकडून ऑनलाईन अर्ज मागवून घेण्याचे ठरले. सुरवातीला कोट्यापेक्षा अधिक अर्ज आल्यास प्रतीक्षा यादी लावून बाकीच्यांना पुढच्यावेळी तीर्थदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली गेली. मात्र, आता ज्येष्ठांना नव्याने अर्ज देखील करता येत नाही आणि पूर्वी अर्ज केलेल्यांना तीर्थदर्शनासाठी नेले जात नाही, अशी स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com