arrested Kardiguddi murder case
arrested Kardiguddi murder casesakal

Sangli Crime News l बालविवाह प्रकरणी आटपाडीच्या 5 जणांना अटक

लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

सांगली : आटपाडी (Atpadi) तालुक्यात बालविवाहाचा (Child Marriage) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत बाळ जन्माला आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

arrested Kardiguddi murder case
यशवंत जाधव प्रकरण: कॉर्पोरेट मंत्रालयाची मुंबई पोलिसांकडे पत्राद्वारे तक्रार

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सांगलीतील आटपाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह माण तालुक्यातील देवापूर येथील समाधान चव्हाण याच्याशी २८ एप्रिल २०२१ रोजी झाला होता. हे दोघे पुण्यात राहण्यास गेले. यानंतर वर्षभरात तिला दिवस गेले आणि त्यानंतर ती प्रसुतीसाठी पुण्यातील (pune) रुग्णालयात दाखल झाली. यावेळी तिने मृत बालकाला जन्म दिला. यावेळेस बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीची आई व वडील यांनी मुलगी अल्पवयीन असतानाही समाधान चव्हाण याच्याशी लग्न लावून दिले.

arrested Kardiguddi murder case
भडकाऊ भाषणं करुन रोजीरोटीचे प्रश्न मिटणार आहेत का? अजित पवार

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police) मुलीचे आई, वडील, पती, सासू, सासरे यांच्या विरोधात फिर्याद दिली. हा गुन्हा आटपाडी पोलिस ठाण्याकडे वर्ग झाला. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com