Pimpri Chinchwad News: पत्नी की भाऊ ? चिंचवडमध्ये लक्ष्मण जगतापांच्या घरात कोणाला तिकीट, चर्चांना उधाण

Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad News

Pimpri Chinchwad News: राज्यातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात चिंचवडमध्ये लक्ष्मण जगतापांच्या घरात कोणाला तिकीट मिळेल? या चर्चेला उधाण आलं आहे. ( Chinchwad Assembly By Election Laxman Jagtaps Brother Shankar Jagtap And Wife Ashwini Jagtap )

चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून २७ फेब्रुवारीला मतदान तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या कुटुंबातीलच व्यक्तींना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे पत्नी अश्विनी जगतापदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे.

Pimpri Chinchwad News
Parth Pawar: 'आजोबांच्या अन्यायामुळे पार्थ शंभुराज देसाईंच्या भेटीला'; चर्चेला उधाण

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे अस बोलले जात आहे. अद्याप भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नसती तरी शंकर जगताप यांचे नाव आघाडीवर आहे.

राष्ट्रवादीची भूमिका काय?

लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचे निटवर्तीय मानले जायचे. त्यामुळे बंधु शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली तर राष्ट्रवादी भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Pimpri Chinchwad News
Ajit Pawar : कार्यकर्त्याचा टोपी घालण्याचा प्रयत्न; अजितदादा म्हणाले, कोणी नाही घातली, आता...

लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच दुर्धर आजराने निधन झाले आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी जगताप कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले होते.

तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगताप कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com