
Summary
गुहागर येथील शिक्षक चव्हाण कुटुंब चिपळूणमधून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली.
मोबाईल पावसात भिजल्याने बंद झाले आणि संपर्क तुटल्यामुळे कुटुंब, नातेवाईक चिंतेत पडले.
कुटुंब गोंदवलेत सुखरुप असून व्हिडिओद्वारे सर्वांना आपली सुरक्षितता कळवली.
Teacher Family Found Safe : गुहागर येथील एक शिक्षक कुटुंब आपल्या हिंगोलीला आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जायला निघाले होते. हे कुटूंब चिपळूणजवळून गायब झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र आता हे कुटूंब सातारा जिल्ह्यातील गोंदवलेत असल्याने सगळ्यांनी नि:श्वास टाकला आहे. शिक्षक कुटुंबाने सुखरुप असल्याचे आणि त्या रात्री नेमकं काय घडलं हे त्यांना व्हिडिओ द्वारे सांगितले आहे.