Ajay Dhagale Martyr: चिपळूणच्या जवानाला भारत-चीन सीमेवर वीरमरण! मंत्री उदय सामंतांनी केली भावूक पोस्ट

जवानाच्या मृत्यूमुळं गावावर शोककळा पसरली आहे.
Ajay Dhagale Martyr
Ajay Dhagale Martyr
Updated on

मुंबई : कोकणच्या भूमिपुत्राला भारत-चीन सीमेवर वीरमरण आल्याचं वृत्त आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. आपण या जवानाच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दांत त्यांनी सांत्वनही केलं आहे. (Chiplun resident Indian Army Subhedar Ajay Dhagale martyr at Arunachal Pradesh)

सामंत म्हणाले, "रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील ढगळेवाडीचे भूमिपुत्र सुभेदार अजय ढगळे हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अरुणाचल येथे त्यांना वीरमरण आले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो"

Ajay Dhagale Martyr
Patra Chawl Case : संजय राऊतांना तुरुंगवास भोगावा लागलेलं पत्राचाळ प्रकरण पुन्हा चर्चेत; ईडीकडून मोठी कारवाई

दरम्यान, चीन सीमेलगतच्या अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात बर्फ वितळण्याला सुरुवात झाली होती. त्यामुळं या भागात रस्ता तयार करण्यासाठी रेकीच्या कामावर काही जवानांवर सोपवली होती. यामध्ये सुभेदार अजय ढगळे यांच्यासह इतरही काही जवान गेले होते. पण या भागात भूस्खलन झाल्यानं त्यामध्ये हे सर्व जवान अडकले. 27 मार्च रोजी सकाळी रेकी करण्यास गेलेल्या या जवानांचा या दुर्घटनेत समावेश होता. तेव्हापासून हे जवान बेपत्ता होते.

हे ही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

गेल्या आठवड्याभरापासून लष्कराकडून या जवानांचा शोध घेतला जात होता. या कामात अनेक अडथळे येत होते पण अखेर शनिवारी सकाळी लष्कराच्या पथकांना आधुनिक उपकरणांनी सहाय्यानं या जवानाचा मृतदेह मातीखाली सापडला. या दुर्घटनेत इतर पाच जवान जखमी झाले आहेत. लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com