Chitra Wagh : 'एकट्या अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो...बाष्कळ विधानं बंद करा'; वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

chitra Wagh first reaction on rupali chaakankar women commission notice over tejaswini pandit urfi javed case
chitra Wagh first reaction on rupali chaakankar women commission notice over tejaswini pandit urfi javed case

मुंबईः महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले होते. वाघ यांना नोटीस पाठवल्याचंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलेलं. त्याला आज चित्रा वाघ यांनी जोरदार उत्तर दिलं.

चित्रा वाघ म्हणाल्या...

  • आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हीही तिथे काम करुन आलेलो आहोत

  • एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो

  • आयोग म्हणजे अध्यक्षासह सदस्य असतात

  • महाराष्ट्राचे डीजी आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात

  • एकटी मी म्हणजे आयोग, हे डोक्यातून काढा

  • मला पाठवलेली नोटीस सर्व सदस्यांच्या सहमतीने पाठवली का?

  • मुंबई पोलिस आयुक्तांनी दखल घेतली नाही, हे कशाच्या आधारावर सांगता.

  • एवढ्या मोठ्या पदावर बसल्यानंतर अशी विधानं शोभत नाहीत

  • बाष्कळ विधानं बंद केली गेली पाहिजेत

  • शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही

  • हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

रुपाली चाकणकर काल काय म्हणाल्या होत्या ?

  • कुणावर कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो

  • चित्रा वाघ खोटी माहिती देत आहात

  • तेजस्विनी पंडित हिला महिला आयोगाने कधीही नोटीस पाठवली नाही

  • दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती.

  • चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतली

  • दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे

  • १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा.

  • अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com