esakal | राऊतांची तालिबानी वृत्ती रश्मी ठाकरे ठेचणार का? चित्रा वाघ यांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

राज्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढत आहेत. सरकारला विशेष अधिवेशन बोलवायला लावावे अशी मागणी भाजपच्या महिला शिष्ठ मंडळाने राज्यपालांकडे केली आहे.

राऊतांची तालिबानी वृत्ती रश्मी ठाकरे ठेचणार का? चित्रा वाघ यांचा सवाल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - साकिनाका बलात्कार प्रकरण आणि राज्यात महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि भाजप महिला आमदारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढत आहेत. सरकारला विशेष अधिवेशन बोलवायला लावावे अशी मागणी भाजपच्या महिला शिष्ठ मंडळाने राज्यपालांकडे केली आहे. एट्रॉसिटी कायद्या प्रमाणे महिला एट्रॉसिटी कायदा करावा अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

चित्रा वाघ यांनी सामनामध्ये साकिनाका घटनेवर लिहिण्यात आलेल्या अग्रलेखावरही टीका केली आहे. संजय राऊत यांची तालिबानी वृत्ती रश्मी ठाकरे ठेचून काढणार का असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. साकिनाका घटनेत एक आरोपी पकडला आहे असे संजय राऊत लिहतात अजून तपास सुरू असतांना एक आरोपी पकडला आहे हे राऊत कसे सांगू शकतात. संजय राऊत मुंबईचे सिपी झाले आहेत का? असा प्रश्न ही वाघ यांनी उपस्थित केला आहे..

महिला आयोगाच्या स्थापनेच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्र सोडले. त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारला अजून महिला आयोगाची स्थापना करता आली नाही. महिला बालकल्याण मंत्री फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठवली आहे सांगत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्र्यांना किंमत नाही तर सामन्यांना काय न्याय मिळणार असा प्रश्नही त्यांनी विचारला.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीसोबत संमतीने शरीरसंबंध ठेवणे बलात्कारच - HC

महिला आयोग स्थापन झाले नसले तरी काम सुरू आहे असे सगणाऱ्यांच्या डोळ्याखाली घटना घडत आहेत मग याचे उत्तर मंत्री देतील का? महिला आयोग हे महिलांच्या न्यायासाठी एक व्यासपीठ आहे ते बंद करायचे असेल तर सरकारने तसं सांगावे असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

loading image
go to top