मेटेंच्या अपघाती मृत्यूची होणार CID चौकशी; CM शिंदेंचे आदेश

मेटे यांचे कुटुंबिय आणि समर्थकांनी त्यांचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित केली होती.
MLA Vinayak Mete Accident Death
MLA Vinayak Mete Accident Deathesakal

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत. मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. (CID inquiry into accidental death of Vinayak Mete Chief Minister Vinayak Mete ordered)

विनायक मेटे यांच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी त्यांचा मृत्यू अपघात की घातपात असा संशयवजा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं या सर्व प्रकरणाची राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.

MLA Vinayak Mete Accident Death
आर्थिक दुर्बल घटकांची घर रोहिंग्यांना दिलेली नाहीत; गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

दरम्यान, मेटे यांच्या निधनामुळं त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून संधी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. शिवसंग्राम संघटना भाजपसोबत युतीत आहे. त्यामुळं त्यांच्या पत्नीला आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.

MLA Vinayak Mete Accident Death
सावरकर पोस्टर वादावर इतिहासतज्ज्ञ विक्रम संपथ यांचा संताप; म्हणाले..

विनायक मेटे यांच्या कारला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर नुकताच भीषण अपघात झाला. यामध्ये मेटे यांचं निधन झालं. तीन दिवसांपूर्वी रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पतीच्या अपघाती निधनावर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला असून मेटेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षासाठी मोठा लढा उभा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com