CISCE Result 2020 : दहावी आणि बारावीचे निकाल आज होणार जाहीर!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

या परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांना सीआयएससीईच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या (सीआयएससीई) वतीने घेण्यात येणाऱ्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) २०२० परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. १०) दुपारी तीन वाजता जाहीर होणार आहे.

पुण्याच्या महापौरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; 'या' तारखेपर्यंत राहणार होम क्वॉरंटाईन!​

या परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांना सीआयएससीईच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. शाळांचा निकाल पाहण्यासाठी सीआयएससीईच्या करिअर्स या पोर्टलवर मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे पाहता येणार आहे. या प्रक्रियेबाबत काही शंका अथवा अधिक माहिती हवी असल्यास शाळांनी ciscehelpdesk@orioninc.com यावर किंवा १८००-२६७-१७६० या मदत कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन सीआयएससीईच्या वतीने करण्यात आले आहे.

Breaking : आता पुणे जिल्हा परिषदेतही कोरोनाने केली एन्ट्री​

तसेच विद्यार्थ्यांना पेपर पुर्नतपासणीची संधी देण्यात येणार आहे. ज्या विषयांची लेखी परीक्षा झाली, त्याच विषयांचे पेपर पुन्हा पुर्नतपासणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना पुर्नतपासणीसाठी निकाल लागल्यानंतर सात दिवसांत (१६ जुलैपर्यत) अर्ज विहित शुल्कासह करता येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती सीआयएससीईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

काय सांगता! राज्यातील पालकमंत्री पदे ही घटनाबाह्य!​

विद्यार्थ्यांना असा निकाल पाहता येईल :
- सीआयएससीईच्या अधिकृत संकेतस्थळावरील 'रिझल्ट २०२०' या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर विद्यार्थ्यांनी आयसीएसई किंवा आयएससी अभ्यासक्रम निवडावा.
- विद्यार्थ्यांनी आपला यूनिक आयडी, इंडेक्स नंबर टाकावा.
- त्यानंतर निकाल पाहण्यासाठीच्या आवश्यक सूचना स्क्रीनवर दिसतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'एसएमएस'द्वारेही पाहता येईल निकाल :
मोबाईलवर एसएमएस'द्वारे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी 'आयसीएसई इयर २०२०' किंवा 'आयएससी इयर २०२०' असे टाइप करून त्यापुढे सात आकडे असलेला यूनिक आयडी क्रमांक द्यावा. आणि हा मेसेज '०९२४८०८२८८३' या क्रमांकावर पाठवावा. या मेसेजद्वारे विद्यार्थ्यांना सविस्तर निकाल पाहता येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CISCE to release Class 10 ICSE And Class 12 ISC results at 3 PM Friday 10th July