काय सांगता! राज्यातील पालकमंत्री पदे ही घटनाबाह्य!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १६३ (१) मधील तरतुदीत पालकमंत्री या पदाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुळात हे पदच घटनाबाह्य ठरते आहे.

पुणे : राज्यात जिल्हानिहाय नियुक्त करण्यात आलेले पालकमंत्रीपद घटनाबाह्य आहे. त्यामुळे ही राज्यातील सर्व पदे तत्काळ रद्द करावीत, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. 

पर्यटकांसाठी खुशखबर! 'एमटीडीसी'ने घेतला महत्त्वाचा निर्णय!​

या मागणीसाठी ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांनी कोशियारी यांना पत्र पाठविले आहे. राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मेगा भरती! पुणे जिल्हा परिषद दीड हजार रिक्त पदे भरणार!​

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १६३ (१) मधील तरतुदीत पालकमंत्री या पदाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुळात हे पदच घटनाबाह्य ठरते आहे. मग पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीकडून बैठका कोणत्या नियमाच्या आधारे घेतात? असा सवाल या पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.

ग्राहकांना त्रास कशाला? महावितरणला झालेले नुकसान 'असे' भरुन काढा!​

परिणामी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतले जाणारे निर्णय लोकाभिमुख नसतात. हे सर्व निर्णय राजकीय हितसंबंध डोळ्यासमोर ठेवून आणि एका विशिष्ट हेतूने घेतले जातात. यामुळे जनतेला मनस्ताप होत आहे. शिवाय या जबाबदारींमुळे संबंधित मंत्र्यांचे त्यांच्या मूळ खात्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: post of Guardian Minister should be canceled All India Consumer Panchayat has demanded to Governor Bhagat Singh Koshyari