लाईट बिल भरलं नाही म्हणून फोन आला तर सावधान, अन्यथा होईल मोठं नुकसान!

Light Bill Fraud SMS
Light Bill Fraud SMSesakal
Summary

सध्या मोठ्या प्रमाणावर विविध कारणांनी नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

सध्या मोठ्या प्रमाणावर विविध कारणांनी नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याला नागरिकही हकनाक बळी पडत आहेत. आता ताजा प्रकरण समोर आलंय. लाईट बिल (Light Bill) भरलं नाही म्हणून, तुम्हाला फोन करुन तुमची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली जाऊ शकते. अशी फसवणूक टाळायची असेल, तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा..

'माझे एक नातेवाईक घाईत होते. त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. एमएसईबीमधून (MSEB) बोलत असल्याचं तो म्हणाला. तुमचं लाईट बिल भरलं गेलं नाही, त्यामुळं आम्ही पाठवत असलेल्या लिंकवर क्लिक करुन माहिती भरा, असं म्हणून त्यानं एक लिंक पाठवली. लाईट बिल भरलं नाही, तर कनेक्शन कापण्यात येईल, असं सुद्धा त्यानं सांगितलं. माझे नातेवाईक गडबडीत होते. त्यामुळं त्यांनी ती व्यक्ती सांगते तसं केलं. काही वेळानं त्यांच्या खात्यातून पैसे जाण्यास सुरुवात झाली. पैसे कट होताहेत हे कळेपर्यंत त्यांच्या खात्यातून हजारो रुपये काढून घेण्यात आले होते', असं एका व्यक्तीच्या बाबतीत घडलंय, त्यानं ही हकीकत सांगितलीय.

कदाचित, तुमच्यासोबत किंवा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तिसोबत असं काही घडलेलं असू शकतं. हा एकप्रकारचा ऑनलाइन फ्रॉड सध्या सुरुय. त्यामुळं हा नेमका फ्रॉड कसा असतो आणि त्यापासून वाचायचं कसं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करु.. चला तर मग जाणून घेऊ..

Light Bill Fraud SMS
आनंदाची बातमी! 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ, जाणून घ्या कसं

तुम्हाला अनोळखी नंबर वरून एक मेसेज येईल किंवा फोन येईल आणि तुमचे लाईट बिल भरलं गेलं नाही, असं ती व्यक्ती सांगेल. असा जर फोन तुम्हाला आला तर समजून घ्या कोणीतरी तुमची फसवणूक करतंय. हे चोरटे तुमचा विश्वास संपादन केल्यावर तुम्हाला एमएससीबी किंवा संबंधित वीज वितरण कंपनीचा लोगो असलेले अॅप डाऊनलोड करायला सांगतात. त्यानंतर एनी डिस्क, क्विक सपोर्ट किंवा टीम विवर सारखे थर्ड पार्टी रिमोट एक्सेस अॅप डाऊनलोड करायला सांगतात.

Light Bill Fraud SMS
उत्तर प्रदेशनंतर MIM ची राजस्थानात एन्ट्री; ओवैसींचा पक्ष आजमावणार निवडणुकीत नशीब

या अॅप्सच्या माध्यमातून अनोळखी लिंक पाठवून वीज बिल भरायला सांगितलं जातं. सुरुवातीला लाईट बिलासारखे कमी पैशाचे व्यवहार करायला सांगतात. परंतु, तुम्ही थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड केल्यामुळं तुमच्या बॅंक खात्यातील (Bank Account) रक्कमेवर ते डल्ला मारायला सुरुवात करतात. इथपर्यंतच ते थांबत नाहीत, तर शेवटी थर्ड पार्टी अॅप डिलीट सुद्धा करायला सांगतात, जेणेकरुन पैसे गेल्याचा मेसेज तुमच्याजवळ पुरावा म्हणून राहत नाही.

Light Bill Fraud SMS
ठरलं! आझमगडमधून डिंपल यादवांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

अशा स्कॅममध्ये तुम्हाला अडकायचं नसेल, तर काय करायला पाहिजे?

तुम्हाला आलेल्या अनोळखी फोन कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका. मग, तो फोन बॅंकेकडून आलेला असो किंवा एमएससीबीकडून. कोणतंही थर्डपार्टी अॅप डाऊनलोड करु नका. कोणालाही तुमचा ओटीपी शेअर करु नका. त्याचबरोबर तुमच्या खात्याची गोपनीय माहिती शेअर करु नका. कोणतंही बिल अधिकृत साईटवर जाऊन किंवा प्रत्यक्ष कार्यालयात भरा. या गोष्टी केल्या तर तुमच्यासोबत होणारी फसवणूक तुम्ही टाळू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com