
- नरेंद्र साठे
पुणे - राज्यामध्ये गाळप हंगाम मध्यावर आला आहे. गतवर्षीच्या गाळपाच्या तुलनेत यावर्षी जवळपास ८३ लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. तर आत्तापर्यंतच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १०८ लाख क्विंटल साखरेचे कमी उत्पादन झाले आहे. बदलत्या हवामानाचा फटका ऊसक्षेत्राला बसला असून, यावर्षीच्या गाळप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे.