फडणवीसांनी पदभार स्वीकारताच 'या'वर केली पहिली सही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानभवनात पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरीही केली. ही स्वाक्षरी कोणत्या कामासाठी झाली, असा प्रश्न अनेक जणांना पडला आहे.

मुंबई : सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) विधिमंडळात आपल्या पहिल्या आदेशावर सही केली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. बहुमत नसताना सरकार स्थापन करण्यात आल्याने याविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर उद्या अंतिम निर्णय होणार आहे.

आम्हाला वेडे म्हणणाऱ्यांचीच 'पागलपंती' सुरू : आशिष शेलार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानभवनात पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरीही केली. ही स्वाक्षरी कोणत्या कामासाठी झाली, असा प्रश्न अनेक जणांना पडला आहे. तर फडणवीसांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी केली आहे. दादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजॉय मेहताही उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis’ first signature of this tenure was done on a CM Relief Fund cheque