आम्हाला वेडे म्हणणाऱ्यांचीच 'पागलपंती' सुरू : आशिष शेलार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

'राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला, मात्र हा सत्तास्थापनेचा दावा नाही तर दिशाभूल करणार पत्र आहे. अलीकडेच एक 'पागलपंती' नावाचा सिनेमा आला. आम्हाला सकाळी वेडे म्हणणाऱ्या लोकांचीच पागलपंती सुरू आहे. या सिनेमाप्रमाणे या लोकांचीही पागलपंती सुरू आहे,' असा टोला भाजपच्या आशिष शेलारांनी लगावला.

मुंबई : 'राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला, मात्र हा सत्तास्थापनेचा दावा नाही तर दिशाभूल करणार पत्र आहे. अलीकडेच एक 'पागलपंती' नावाचा सिनेमा आला. आम्हाला सकाळी वेडे म्हणणाऱ्या लोकांचीच पागलपंती सुरू आहे. या सिनेमाप्रमाणे या लोकांचीही पागलपंती सुरू आहे,' असा टोला भाजपच्या आशिष शेलारांनी लगावला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'कायदा सांगतो की सत्तास्थापनेचा दावा जर कोणाला करायचा असेल तर नेता लागतो. नेता कोण, मुख्यमंत्री कोण याचा उल्लेख नाही. सादर केलेल्या पत्रावर गटनेता म्हणून अधिकृत कोणाची सही नाही आणि अशा परिस्थितीत हे म्हणताता की आमच्याकडे 154 आमदारांचे पत्र आहे. ही जनतेची दिशाभूल आहे. सध्या चालू असलेली पागलपंती आहे, अशी टीका शेलारांनी केली. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला सत्ता मिळाली नाही, तर ते वेडे होतील अशी टीका केली होती. याच टीकेला प्रत्युत्तर देताना शेलारांनी महाविकासआघाडीची पागालपंती सुरू आहे, असे म्हणले. 

महाविकासआघाडीकडे 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र; राजभवनात सादर 

देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, परंतु आज देखील त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करत आहोत, असे या पत्रात म्हटले आहे. सरकार स्थापन करण्यसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आम्हाला सरकार स्थापन करण्यास तात्काळ पाचारण करण्यात यावे अशी विनंती देखील पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. या पत्रावर शिवसेना विधीमंडळ नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Shelar criticize Sanjay Raut today