
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखीचे आज देहूतून प्रस्थान होणार आहे. तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान गुरुवारी होणार आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजता तुकोबारायांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, यंदाच्या आषाढी महापूजेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण दिलंय. पाच वर्षांनी पुन्हा फडणवीस विठ्ठलाची शासकिय महापूजा करणार आहेत.