मुंबई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना गुरुवारी दूरध्वनी केला.