
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर वरिष्ठ सिव्हिल सेवकाची नियुक्ती केली आहे. यापूर्वी या पदावर प्रामुख्याने राजकीय नेत्यांची वर्णी लागत असे. मात्र, एसटी महामंडळात सुरू असलेल्या आर्थिक अनियमितता आणि निर्णय प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.