मुंबई - ‘विधानभवनात मोबाईलवर रमी खेळतानाचे दृश्य आम्हाला नक्कीच भूषणावह नाही. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ‘रमी खेळत नव्हतो. व्हिडिओ अचानक पॉपअप झाला’, असा खुलासा केला असला तरी हे निश्चितच योग्य नाही, अशी जाहीर नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.