
Pandharpur Wari: तीर्थक्षेत्र आळंदी येथे कत्तलखाना उभारला जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातून मोठे स्पष्टीकरण दिले आहे. आळंदीमध्ये कत्तलखाना उभारण्याचा कोणताही मानस नसून, त्यासाठी आरक्षित असलेली जागाही आता रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. यामुळे वारकरी संप्रदाय आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.