
नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीण वनताराला नेण्यात आल्याच्या प्रकरणामुळे सध्या राज्यातलं वातावरण तापलं आहे. कोल्हापुरात आज नांदणीसह परिसरातील नागरिक अन् कोल्हापुरकरांनी महादेवी हत्तीण परत आणावी या मागणीसाठी नांदणी ते कोल्हापूर अशी पदयात्रा काढली. महायुतीच्या नेत्यांकडून महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवी हत्तीण प्रकरणी सविस्तर प्रतिक्रिया दिलीय. महादेवी हत्तीण संदर्भात सरकारची काहीच भूमिका नव्हती, वनविभागाकडून तत्कालीन परिस्थितीत अहवाल दिला गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेच यावर निर्णय दिला असल्याचं फडणवीस म्हणालेत.