
जयसिंगपूर, (जि. कोल्हापूर) - अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याविरोधात प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊ. या प्रश्नाकडे शासनाचे पूर्ण लक्ष आहे.
यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही स्थितीत कोल्हापूर, सांगली जिल्हे पूरमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.