
Maharashtra Politics: कासेगाव ते दहिसर मेट्रोचा टप्पा पूर्ण झाला असून त्याचं टेक्निकल टेस्टिंग केलं जात आहे. टेक्निकल टेस्टिंग झाल्यानंतर हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. या टेक्निकल टेस्टिंगवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मेट्रोच्या या टप्प्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वेवर असलेला वाहतुकीचा ताण कमी होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी आमच्या तिघांची विकासाची एक्सप्रेस सुसाट निघालीय असं सांगत महायुती भक्कम असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.