मुंबई - ‘महात्मा जोतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या एकत्रित साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत जाईल. या साहित्यामुळे नवीन पिढीला प्रेरणादायी दिशा मिळून यशस्वी होण्याचा मार्ग मिळेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.