मुख्यमंत्री फडणवीस यांचा विजय झाला पण...| Election Results 2019

टीम ई-सकाळ
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

विजयी जल्लोष नाही

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी आज (गुरुवार) सकाळी आठपासून सुरु झाली. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला. पण विजयाचा कोणताही जल्लोष केला जाणार नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपकडून देवेंद्र फडणवीस तर काँग्रेसकडून आशिष देशमुख यांच्यात प्रमुख लढत होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडे लागले होते. मात्र, भाजपच्या अपेक्षेप्रमाणेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा विजय झाला तर देशमुख यांचा पराभव झाला. 

विजयी जल्लोष नाही

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विजय झाला असला तरी भाजपला नागपूर आणि विदर्भात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आता भाजपकडून विजयी जल्लोष केला जाणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस सायंकाळी 7 वाजता नागपूरात प्रमाणपत्र घेऊन लगेच मुंबईला परत जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis will not Celebrates his Victory