CM Ekanth Shinde : मुख्यमंत्री शिंदे राज्यभर फिरणार

वाड्या-वस्त्यांपासून शहरांमध्ये शिंदे यांच्या सभांचे रान उठण्याचे चिन्हे
CM Ekanth Shinde visit of maharashtra Shiv sena politics Uddhav Thackeray Aditya Thackeray mumbai
CM Ekanth Shinde visit of maharashtra Shiv sena politics Uddhav Thackeray Aditya Thackeray mumbaisakal
Updated on

मुंबई : सत्तेतून पायउतार आणि पक्ष फुटीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बंडखोरांना धडा शिकविण्याच्या इराद्याने राज्यभर फिरणार असले तरी त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राज्यव्यापी दौरा काढून खरी शिवसेना आपलीच आहे, असे सांगणार आहेत. त्यासाठी वाड्या-वस्त्यांपासून शहरांमध्ये शिंदे यांच्या सभांचे रान उठण्याचे चिन्हे आहे. या दौऱ्यांचा कार्यक्रम पुढील काही दिवसांत जाहीर होईल. राज्यातील पुढच्या निवडणुका आणि आपल्या गटाच्या आमदार त्यांच्या समर्थकांना ताकद देण्यासाठी शिंदे यांचा हा दौरा महत्त्वाचा राहणार आहे. ठाकरे-शिंदे हे दोघेही संघटनेसाठी मैदानात उतरणार आहेत.

मुख्यमंत्रिपदानंतर शिंदे यांनी मोजके दौरा काढून शिवसेनेला अर्थात ठाकरे यांना आव्हान दिले. काही भागांत लोकांची गर्दी जमवून त्यांनी शक्तीप्रदर्शनाची संधी साधली. त्याचवेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हेही फिरत होते. आदित्य यांची शिवसंवाद यात्रा संपल्यानंतर पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून म्हणजे, ठाण्यातून महाप्रबोधन यात्रेला सुरवात करणार आहेत. शिंदे- फडणवीस सरकार मजबूत झाल्यानंतर शिंदे हेही आपला गट सक्षम करण्यासाठी जनतेत जाणार आहेत. पावसाळी अधिवेशनानंतर काही दिवसांतच त्यांचे दौरे होतील, असे सांगण्यात आले आहे. मुंबईसह अन्य महापालिका आणि इतर निवडणुकाही होणार असल्याने पुढच्या काळात राजकीय धुरळा उडणार आहे. त्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यातील लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागणार आहे. या पार्श्वभूमीवर नव्या जोमाने पक्षाची ताकद वाढविण्याची धडपड ठाकरे करीत आहेत. ठाकरे यांच्या तुलनेत तगडे ठरण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com