Vijay Shivtare: CM शिंदेंकडून विजय शिवतारेंना मोठी जबाबदारी, आता विरोधकांना…

CM eknath Shinde appoints vijay shivtare as spokesperson of balasahebanchi shivsena faction rak94
CM eknath Shinde appoints vijay shivtare as spokesperson of balasahebanchi shivsena faction rak94Sakal
Updated on

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्ते पदी विजय शिवतारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. त्यामुळे शिवतारे हे आता शिंदे गटाची आवाज ठारणार आहेत. शिवसेनेतून शिवतारेंची हकालपट्टी झाल्यानंतर एकप्रकारे त्यांचे शिंदे गटाकडून पुनर्वसन करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

विजय शिवतारे हे आता शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांच्या सोबत शिंदे गटाची बाजू मांडताना दिसणार आहेत. त दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी मंत्री राहिलेल्या विजय शिवतारे यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागावरून पक्षातून हकालपट्टी केली होती. पुणे जिल्ह्यातील पुरंदर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे शिवतारे यांची हकालपट्टीबद्दलची माहिती शिवसेनेच्या 'सामना'च्या मुख पत्रातून जाहीर करण्यात आली होती. आता प्रवक्तेपद शिवतारेंना मिळाल्याने आता विरोधकांना त्यांचा सामना करावा लागणार आहे.

CM eknath Shinde appoints vijay shivtare as spokesperson of balasahebanchi shivsena faction rak94
Abdul Sattar Controversy: सत्तारांच्या वादग्रस्त टीकेवर 'जय हिंद जय महाराष्ट्र' करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

या हकालपट्टीनंतर पुण्यात शिवतारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना आहे असे सांगितले होते. दरम्यान शिवतारे यांना प्रवक्तेपद मिळाल्याने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्षात ते त्यांच्या गटाची बाजू आक्रमक पणे मांडतील असे बोलले जात आहे.

CM eknath Shinde appoints vijay shivtare as spokesperson of balasahebanchi shivsena faction rak94
Jitendra Awhad: …ही परंपरा तर पुरंदरेंनीच सुरू केली; संभाजीराजेंच्या आक्षेपानंतर आव्हाडांचं ट्विट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com