पंढरपुरात शिंदे गटाचा पहिला मेळावा; वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath shinde

पंढरपुरात शिंदे गटाचा पहिला मेळावा; वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

पंढरपूर : आज आषाढी एकादशी निमित्त शिंदे गटाचा पहिला मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते. आपल्याच माणसाने आपल्यावर वार केले असं म्हणत त्यांनी खंत यावेळी व्यक्त केली आहे. तसेच पंढरपूरच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. या मेळाव्याला शिवसेनेचे तानाजी सावंत देखील उपस्थित होते. (Eknath Shinde In Pandharpur)

पंढरपूरमध्ये बोलताना त्यांनी मी शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही, मीही शिवसैनिक म्हणून काम करेल, आणि मी सध्या मुख्यमंत्री असलो तरी मी जनतेचा सेवक आहे. तुम्ही मला फक्त कामाची यादी सांगा मी तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. यावेळी बोलताना पंढरपूरच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा: काली पोस्टर वाद सुरू असताना पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले काली माँ...

बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सर्व आमदार पुढे चाललो आहोत. दिघे साहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. दिघे साहेबांचे शब्द आजही माझ्या कानात घुमतात असं ते म्हणाले. मी साधा शिवसैनिक होतो, पण मी सत्ता सोडून फक्त बाळासाहेबांच्या विचाराल पुढे नेण्यासाठी वेगळे झालो. माझ्यावर टीका झाली, खालच्या पातळीवर बोललं गेलं पण आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही महाराष्ट्राचा विकास करून त्यांना उत्तर देणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.

या लोकांनी आमच्यावर टीका केली कामाख्यादेवीसाठी आम्ही रेडे पाठवले आहेत असं म्हणाले पण कामाख्यादेवीने आम्हाला काय दिलं तुम्हाला दिसलं असेलच. मी कधीही कुणावर टीका करत नाही. मी काम जास्त करतो पण कमी बोलतो हे सर्वांना माहिती आहे. आम्ही केलेलं बंड हे ऐतिहासिक आहे. याची जगाने दखल घेतली आहे. असं प्रेम खूप कमी लोकांना मिळतं ते मला मिळालं असं ते म्हणाले. त्याचबरोबर आमच्यावर टीका करणाऱ्याला आम्ही कामातून उत्तर देणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.

Web Title: Cm Eknath Shinde Ashadhi Ekadashi Pandharpur Speach

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..