राज्यातील जनतेला CM शिदेंकडून मोठं गिफ्ट: CM Eknath Shinde birthday big gift Aapla Dawakhana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde: राज्यातील जनतेला CM शिदेंकडून मोठं गिफ्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे. आज त्यांनी अनेक योजनांचे उद् घाट केले. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे ''आपला दवाखाना'' योजनेच्या विस्ताराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (CM Eknath Shinde birthday big gift Aapla Dawakhana)

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज विविध योजनांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली.

राज्यातील सर्व घटकातील आरोग्य उत्तम राहण्यासाठी या सर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आलटे असल्याचे शिंदेंनी सांगितले. या अभियानाच्या उद्घाटनावेळी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

'मुंबईनंतर आता राज्यातील प्रत्येक तालुक्यात 'आपला दवाखाना' सुरू करण्यात येणार आहे. तब्बल ५०० ठिकाणी या दवाखान्याचा शुभारंभ होणार असून याचा लाभ जनतेला होणार आहे. अशी माहिती शिंदे यांनी दिली.

८० टक्के समाजकारण आणि त्यानंतर २० टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार सरकारची वाटचाल सुरू आहे. राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यादांच आरोग्याचा महायज्ञ होत आहे.

सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या प्रश्नावर आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या पुढाकारातून अभियान राबवण्यात येत आहे'', असं यावेळी त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Eknath Shinde