Maharashtra Politics News : आता शिंदेंचं काय होणार? ज्यांच्यासोबत 36चा आकडा तेच आले साथीला

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतलं सर्वांत मोठं बंड केलं आहे.
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCPSakal
Updated on

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्या रूपाने बंड झालं असून अजित पवार हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत. अजित पवार यांच्यासोबत ९ आमदारांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांना तब्बल राष्ट्रवादीच्या ३० ते ४० आमदारांचा पाठिंबा आहे.

दरम्यान, बरोबर एका वर्षापूर्वी शिवसेनेतून एकनाथ शिंदे आपल्यासोबत ४० आमदारारांना आणि १० अपक्ष आमदारांना घेऊन बाहेर पडले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं. या घटनेच्या एका वर्षानंतर राजकारणातील सर्वांत मोठी घडामोड घडली आहे.

Ajit Pawar NCP
मोठी बातमी! अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला शरद पवारांचा पाठिंबा नाही | Ajit Pawar

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या आमदारांवर अन्याय करत होते. ते आमच्या आमदारांना निधी उपलब्ध करून देत नव्हते. त्यामुळे आम्ही या सरकारमधून बाहेर पडलो आहोत. असं सांगत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार बाहेर पडले होते. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा अजित पवार यांना जवळपास पूर्ण विरोध होता.

पण आता तेच अजित पवार हे शिंदे फडणीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र काम करावे लागणार असून त्यांचा पुढचा प्रवास कसा होणार याकडे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com