"कंत्राटदारासोबतचे सेटिंग बिघडले असावे..."; मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका, विरोधकांना केले गप्प

धारावी झोपडपट्टीचा विकास होऊ नये असेच त्यांना वाटत आहे. मात्र जनतेला खरे काय हे माहिती असल्याने एक दिवस हा मोर्चा त्यांच्यावरच उलटेल याकडेही एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले.
Dharavi Redevelopment Project
Dharavi Redevelopment Project

Dharavi Redevelopment Project: विरोधीपक्षाच्यावतीने सादर केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाऱ्याच्या कहाण्या सांगून थेट उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले. ‘पाहिजे खर्चा तो निकालो मोर्चा‘ यासाठी धारवीच्या पुनर्विकासाच्या विरोधात शिवसेना आंदोलन करीत असल्याची टीकाही त्यांनी विधानसभेत केली.

कोव्हीडचा फायदा घेऊन शिवसेनेच्या युवा नेत्याने रोमिंग छेडा रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाला ऑक्सिजन प्लांटसह दर महिन्याला एक कंत्राट देण्याचा उद्योग केला. हे सर्व घोटाळे तपासात उघड झाले आहे. त्याची कागदपत्रे व पुरावेसुद्धा उपलब्ध आहेत. ते सर्व बाहेर येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे इशाराच दिला.

धारवीच्या पुनर्विकासाचे कंत्राट व त्याची प्रक्रिया उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळात झाली. सरकार असताना त्यांनी यावर कुठलाच आक्षेप घेतला नाही. आता सत्ता जाताच त्यांना धारावीच्या नागरिकांची चिंता सतावू लागली आहे. याकरिता मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. कंत्राटदारासोबतचे सेटिंग कदाचित बिघडले असावे असा चिमटा काढून एकनाथ शिंदे यांनी खर्च काढण्यासाठी मोर्चा काढण्यात आला असल्याचा आरोप केला.

धारावीची सर्व प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. नियमानुसारच टीडीआर देण्यात आला आहे. येथील सर्वच झोपडपट्टीधारकांना घरे दिली जाणार आहेत. धारावी झोपडपट्टीचा विकास होऊ नये असेच त्यांना वाटत आहे. मात्र जनतेला खरे काय हे माहिती असल्याने एक दिवस हा मोर्चा त्यांच्यावरच उलटेल याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मातोश्री १ ते मातोश्री २ असा उद्धव ठाकरे यांचा प्रवास अभिमानास्पद आहे. धारावीचा पुणर्विकास प्रकल्प सुरु आहे. याविरोधात मोर्चा काढला होता. निविदेच्या अटी कायम ठेवणे घोटाळा नसतो. रहीवाश्यांना प्रत्यक्ष मदत करणे हा घोटाळा नाही. १ ऑक्टोबर २०२२ रोजी धारावीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली. ही प्रक्रिया ४५ दिवस चालली. धारावीच्या शेजाऱ्यांचे जर धारावीवर एवढं प्रेम होत. तर इतर कंपन्यांना हे ग्लोबल टेंबर होतं. यामध्ये इतर कंपन्यांनी देखील सहभाग घ्यायला पाहीजे होता, अशा प्रकारचे काम करायला पाहीजे होतं.

Dharavi Redevelopment Project
Madhya Pradesh Dinosaur Eggs : कुलदैवत म्हणून करत होते पूजा, अन् ते निघालं डायनासोरचं अंडं! मध्य प्रदेशातील प्रकार

मोठ्या विकासकांना सहभागी करायला पाहीजे होतं. पण यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द का केली? हा प्रकल्प रद्द करुन ही प्रकल्प रखवडण्याची त्यांचा प्लॅन आहे. सर्वसामान्य लोकांना घरे मिळाली पाहीजे.  त्यांचा विकास व्हायला पाहिजे. पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द केली कारण हा प्रकल्प एका विशिष्ट माणसाला मिळावा, असा हेतू होता. सेटलमेंट तुटली की काय? स्वत: मोर्चा काढायचा आणि सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं हे बरोबर नाही. यामध्ये टेंडर द्यायला विरोध होता तर यापूर्वी प्रक्रियेत असलेलं टेंडर का रद्द केलं, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांचा लाडका कंत्राटदार रोमिंक छेडा, कोविड काळात लाईफ लाईन हॉस्पिटमधील काल्पनिक डॉक्टर, काल्पनिक रुग्ण, खिचडी वाटपाचे उपकंत्राट, रेड डेसिव्हर खरेदीसाठी युवा नेत्याच्या सांगण्यावरून दिलेले कंत्राट, बाजारभावापेक्षा दुप्पट रकमेत खरेदी केलेले रेमडिसिव्हर याच नावानिशी उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. माझे कुटुंब माझी जबाबदारी अन् सर्व टेंडर यांच्या घरी अशा शब्दात शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. विरोधकांनी आरोप करताना विचार करावा. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मीसुद्धा मंत्री होतो. सर्व व्यवहार मला ठावूक आहेत. माझ्य पोतडीत बरेच काही दडले आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना गप्प केले.

Dharavi Redevelopment Project
New Laws : फौजदारी कायद्यात बदल; मॉब लिचिंग केल्यास होणार फाशीची शिक्षा; शहांची लोकसभेत माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com