'महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहातोय'; सेनेला दसरा मेळाव्याची परवानगी द्या..!

केशव उपाध्ये यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टिका
shivsena
shivsenaesakal

शिवाजी पार्कवरील मेळाव्यावरून शिवसेनेत आणि शिंदे गटात मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हणाले आहे की शिवाजी पार्कवर पेंग्विनसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी दिली पाहिजे कारण, बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहातोय.

केशव उपाध्ये यांनी जोगदार टिका केली आहे, त्यांनी आदित्या ठाकरे यांच्यावर नाव नघेता टिका केली आहे, ते म्हणाले की काही प्राणी वाघाचं कातडं पांघरतात, असं म्हणतात. तसंच यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरले होते. आता ते कातडे फाटून त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. सत्ता असताना जे घराबाहेरही पडले नाहीत ते आता महाराष्ट्र पिंजून काढायला निघाले आहेत. त्यांना जनतेच्या असंतोषाला सामोरे जाण्याऐवजी पद सोडून पळ काढणारे ठाकरे यांची भाजपला अस्मान दाखविण्याची भाषा म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ असाच प्रकार आहे. आधी फुटलेले तोंड सुधारा, जमिनीवरून धडपडत तरी नीट उभे राहा, आणि मग अस्मान दाखविण्याच्या वाफा सोडा.

हे करताना पाठीमागे कोणी आहे की ,नाही हे तपासून पाहायला विसरू नका. नाहीतर शिल्लक पेंग्विनसेनेचे पळपुटे शिलेदार तुम्हाला वाऱ्यावर सोडून पळून गेलेले असतील. त्यांची काळजी घ्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा अमलात आणण्याची ‘हीच ती वेळ’ आहे.

शिवाजीपार्क वरून वाद सुरू असतानाच आता केशव उपाध्येयांनी उद्धाव ठाकरेयांच्यांवर देखील टिका केली ते "म्हणाले जे सत्ता असताना घरा बाहेर पडले नाही, ते आता महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. जनतेच्या असंतोशाला घाबरून पद सोडण्याऱ्यांनी भाजपाला आस्मान दाखवण्याची भाषा करण्याआधी फुटलेले तोंड सुधारा, जमिनीवरून धडपडत तरी नीट उभे राहा, आणि मग अस्मान दाखविण्याच्या वाफा सोडा."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com