शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवर फूट! उद्या शिक्कामोर्तब होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या लोकसभा अध्यक्षांना देणार पत्र
CM Eknath Shinde letter to Lok Sabha Speaker shivsena uddhav thackeray maharashtra politics
CM Eknath Shinde letter to Lok Sabha Speaker shivsena uddhav thackeray maharashtra politics Sakal

मुंबई : उद्धव ठाकरे यांना मोठा झटका देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली, यासोबतच त्यांनी शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. दरम्यान उद्या उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का बसू शकतो, उद्या शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवर फूट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेतील राष्ट्रीय पातळीवरील फूटीवर शिक्कामोर्तब होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेतील राष्ट्रीय पातळीवरील फूट उद्याच होण्याची शक्यता आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडून यासंबंधी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात शिवसेनेचे ४० आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेना खासदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान उद्या एकनाथ शिंदे दिल्लीत खासदारांची भेट घेऊन आपली शिवसेना NDA सोबत असल्याचा दावा करू शकतात. यापूर्वी शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार शिंदे गटासोबत असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे.

याआधी शिवसेनेचे विनायक राऊत हे लोकसभेत गटनेते होते, मात्र त्यांच्या ऐवजी मुंबईचे खासदार राहूल शेवाळे यांची लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात येण्याची शक्यता आहे. तर मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळी यांची निवड शिंदे गटाने कायम ठेवली आहे. राजन विचारे नाही तर भावना गवळी या मुख्य प्रतोद असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे उद्या ही औपचारिकता लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन पुर्ण केली जाऊ शकते. शिवसेना महाराष्ट्रासोबतच राष्ट्रीय पातळीवर देखील भाजपसोबत जाणार आहे. त्यामुळे उद्या संसदेचे आधिवेशन उद्या सुरु होत असून याच पार्श्वभूमिवर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरणार आहे.

CM Eknath Shinde letter to Lok Sabha Speaker shivsena uddhav thackeray maharashtra politics
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, सर्वच प्रमुख विरोधी पक्षात फूट

दरम्यान शिंदे गटाच्या आज झालेल्या बैठकीत, एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून तर दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड केली गेली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख पदाला हात लावण्यात आलेला नाही. यासोबतच शिंदे गटाने जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये रामदास कदम, आनंदराव आडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, यशवंत जाधव, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा यांची उपनेते पदी निवड करण्यात आली आहे.

आज झालेल्या बैठकीत शिवसेनेचे १४ खासदारही व्हिडीओ कॉन्फरंसींगच्या माध्यमातून उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे उद्या दिल्लीला जाणार आहेत, शिवसेनेच्या खासदारांची भेट घेऊ शकतात.

CM Eknath Shinde letter to Lok Sabha Speaker shivsena uddhav thackeray maharashtra politics
चिंता वाढली! केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com