Eknath Shinde : ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्पही निसटला, तरीही मुख्यमंत्री म्हणतात...

गेल्या दीड महिन्यात हा पाचवा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSakal

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका सातत्याने होत आहे. आतापर्यंत जवळपास पाच प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. आजच ऊर्जा उपकरण प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती हाती येत आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा - हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "कुठलाही प्रकल्प तीन चार महिन्यात येतो आणि जातो नाही ती काही जादूची कांडी नाही. आरोप कोणीही करू शकतं. आमचं सरकार उद्योगांना चालना देणारं आहे. तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल की आम्ही गेल्या तीन महिन्यात काय केलंय. आणि अडीच तीन वर्षांत काय झालं तेही दिसेल. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला आश्वासन दिलंय की मोठ्या प्रमाणावर उद्योग देऊ, रोजगार निर्मिती होईल आणि दोन लाख कोटी २२५ विकासकामांसाठी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार"

Eknath Shinde
Maharashtra News : ४०० कोटींचा ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर; दीड महिन्यातला सहावा मोठा प्रकल्प

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प परराज्यात जात आहेत. पुण्याच्या तळेगाव येथे होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर टाटाचा एअरबस प्रकल्प जो नागपूरमध्ये होणार होता, तोदेखील गुजरातमधल्या वडोदऱ्याला गेला. त्यासोबतच बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क हे प्रकल्प राज्याबाहेर गेले. नुकतंच फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन यांचा विमान इंजिन दुरुस्ती आणि देखभालीचा प्रकल्प नागपूर येथे होणार होता. परंतु हा प्रकल्प हैदराबादला गेला. मात्र २०२१मध्येच सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. आता ऊर्जा उपकरण निर्मिती क्लस्टर प्रकल्प मध्यप्रदेशला मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com