शिंदे सरकारचा मोठा निर्णय! महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Corporation

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती

शिंदे सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व नगरपरिषदा, महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये 40 हजार विविध पदांच्या भरतीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि 'अ' वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची आज परिषद मुंबईमध्ये पार पडली, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.   

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये ३७२० पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे.

टॅग्स :CM Eknath Shinde