CM Eknath Shinde: या दाढीत बऱ्याच लोकांची नाडी; CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

विरारमध्ये आजपासून जागतिक मराठी अकादमी आणि वि.वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 'शोध मराठी मनाचा २०२४' हे १९ वे जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
Updated on

CM Eknath Shinde: विरारमध्ये आजपासून जागतिक मराठी अकादमी आणि वि.वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 'शोध मराठी मनाचा २०२४' हे १९ वे जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राजकीय टोलेबाजी देखील केली.

वसई विरारच्या भूमित चिमाजी आप्पांच्या पावन झालेल्या भूमित हे संमेलन होत आहे. माय मराठीचा जागतिक जागर करणारं हे व्यासपीठ आहे. नोकरी कामधंदा करत स्थिरावलेला मराठी माणूस दिसतो. परदेशात मराठी माणूस भेटला की आगळा वेगळा जिव्हाळा असतो. आता हे योगेंद्रजी नोकरीनिमित्त जपानला  गेले लोकप्रतिनिधीही झाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. (Latest Marathi News)

शोध मराठी मनाचा हे मराठी साहितीकांसाठी हक्काचं व्यासपीठ आहे. काल पंतप्रधान मोदींनी अटल सेतूचं उद्घाटन केलं, पर्यावरणपूरक असा हा सेतू असून अवघ्या १५ मिनिटात शिवडीतला माणूस रायगडात पोहचतोय. हा सेतू पुढे आम्ही विविध काॅरिडोरला कनेक्ट करतोय, हा नुसता महामार्ग नाही गेम चेंजर प्रकल्प आहे. या सेतूमुळे फ्लेमिंगो जातील अशी भीती पर्यावरणवाद्यांनी बोलवून दाखवली त्यावर आम्ही काम करत सेतू उभा केला आता फ्लेमिंगोंची संख्या वाढली आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

CM Eknath Shinde
Raj Thackeray : मी पाहिलेली सर्वात भ्रष्टाचारी ग्रामपंचायत! राज ठाकरे यांना आठवला शोले, कुणाचं घेतलं नाव?

मराठी भाषा वाढवण्यात अनेक मान्यवरांचा हात आहे. आपण ज्या पद्धतीने मराठीच्या माध्यमातून भाषेचा शोध घेत आहात. आम्हीही कामाच्या माध्यमातून विकासाचं मॉडेल आणत आहोत. लवकरच खोपोलितील टनल सुरू होईल, पुण्याला जाण्यासाठी अर्धा तास कमी होईल.

फुटाणे कुठे तरी म्हणाले दाडीवर हात फिरवत यांनी ५० लोकांचा संकल्प केला. पण हे करायला धाडस लागतं, कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी लागते. माझा परिवार हे माझ कुटुंब आणि मी नाही तर हा सर्व आहे, असा चालायचं. मात्र आता असं चालतं नाही. या दाढीत बऱ्याच लोकांची नाडी आहे. आमच्या सरकारची किर्ती आहे कारण आम्ही त्रिमूर्ती आहोत. मी कालही कार्यकर्ता होतो उद्याही आहे परवाही राहिन, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

CM Eknath Shinde
Uddhav Thackeray: लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशाहीवर संक्रात येणार; श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com